डंपरने कारला उडविले; एक ठार, दोन जखमी

साकेगाव, ता. भुसावळ, प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्गावर साकेगावपासून जवळच एका भरधाव डंपरने कारला दिलेल्या धडकेत एक जण जागीच ठार झाला असून दोन गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत वृत्त असे की, साकेगावपासून जवळच असलेल्या आयुष प्रोकॉन कंपनीच्या समोर राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी भीषण अपघात झाला. यात एमएच१९ सीवाय – २२८० या क्रमांकाच्या भरधाव वेगाने धावणार्‍या डंपरने  एमएच-१८ डब्ल्यू ५७८२ या क्रमांकाच्या मारूती सुझुकी कारला जोरदार धडक दिली. या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून दोन गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही जखमींना तातडीने डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच साकेगावसह परिसरातून आयुष प्रोकॉनच्या कर्मचार्‍यांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना रूग्णालयात पोहचवण्यासाठी मदत केली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पंचनामा करण्यात येत आहे.

Protected Content