राज्य सरकारला मराठा आरक्षण कोर्टात टिकवता आलं नाही : चंद्रकांत पाटील

 

मुंबई प्रतिनिधी । राज्य सरकारला मराठा आरक्षण कोर्टात टिकवता आलं नाही, यामुळे मराठा समाजासाठी आज काळा दिवस असल्याची टिका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणावरून निकाल दिल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली देत नोकरी आणि शिक्षणासाठी तूर्त मराठा आरक्षण लागू होणार नाही, असे स्पष्ट केले. चंद्रकांत पाटील म्हणाले, उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी मराठा आरक्षणाकडे लक्ष दिलं नाही. महाविकास आघाडीला आरक्षण नको होतं. म्हणूनच आरक्षणाकडे लक्ष दिलं नाही.

संजय राऊत नावाच्या सरकारला आळा घालावा, असेही ते म्हणाले. कंगनाच्या मुद्द्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, हे लोक कंगनाच्या पाठीशी लांडग्यासारखे लागले असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.

Protected Content