गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा : पोलीस प्रशासनाचे आवाहन

मुक्ताईनगर प्रतिनिधी | कोरोनाचे सावट पूर्णपणे दूर झाले नसून यंदाचा गणेशोत्सव हा शासकीय नियमांचे पालन करून साधेपणाने साजरा करावा असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे अंतुर्ली दूरक्षेत्रात घेतलेल्या बैठकीत करण्यात आले.

याबाबत वृत्त असे की, मुक्ताईनगर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे अतुर्ली दुरक्षेत्र येथे दुरक्षेत्र हद्दीतील अंतुर्ली,बेलसवाडी,नरवेल,बेलखेड, भोकरी,पातोडी,कर्की व लोहरखेडा येथील गणेश मंडळांच्या पदाधिकार्‍यांची बैठक पोलीस निरिक्षक राहूल खताळ आणि त्यांच्या सहकार्‍यांनी घेतली.

या बैठकीत कोरोना पूर्णपणे नष्ट झालेला नसून राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी नियमावली आधीच जाहीर केली आहे. या नियमांचे पालन करून गणेश उत्सव साध्या पध्दतीने साजरा करुन गणेश उत्सव आगमन व विसर्जन वेळी मिरवणुक काढु नये. तसेच सार्वजनीक गणेश मुर्ती ४ फुट व घरगुती गणेश मुर्ती २ फुट पेक्षा मोठी नसावी तसेच ऑनलाईन परवानगी फार्म भरू सोबत हमीपत्र जोडावे असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले. परिसरातील गणेश मंडळांनी याला सहकार्य करण्याची अपेक्षा देखील पोलीस निरिक्षक राहूल खताळ यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

Protected Content