सामाजिक शिस्त, काळजी, शास्त्रशुद्ध उपायांनीच कोरोना जाणार

एरंडोल (प्रतिनिधी)। कोरोना हा आजारच नसून एक थोतांड आहे व असल्यास तो मला होणार नाही ह्या भ्रामक विश्वात जगणारे. दुसरे म्हणजे झाल्यास कोणालाच काहीच त्रास होत नाही, विनाकारण टेस्ट केल्या जातात व आर्थिक लाभा साठी विलगीकरण केले जाते आहे असे व इतर व्हिडीओ व पोस्ट चुकीच्या व अपूर्ण, अशास्त्रीय माहितीच्या आधारे जे नागरिक व्हायरल करतात त्यांच्यामुळे.

जगात भरली भीती
नाही जना शाश्वती,
श्वाश्वत जीवन शिकवायचे
कोरोनाला नष्ट करायचे !
दिवस आपले लढायचे
लढ्यात झुंजत राहण्याचे !

कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे तो दोन प्रकारच्या प्रवृतीच्या नागरिकामुळे.

       दुसऱ्या प्रकारचे नागरिक आहेत ते जे कोरोना आजाराला इतके घाबरतात कि टेस्ट करायलाच पुढे येत नाही. विलगीकरण जाचक आहे, सुविधा मिळतच नाही, उपचार होतंच नाही व प्रत्येक कोरोनाचा रुग्ण दगावतोच व दगावल्यानंतर मृतदेह पण वारसांना दाखवीत नाही व मृतदेहाची विटंबनाच होते, अशी त्यांची पक्की समजूत त्यांनीच करून घेतलेली असते. त्याचप्रमाणे शरीरातील अवयव मुख्यत्वे मूत्रपिंड ( किडनी ) व इतर अवयव काढले जातात, अश्या खोट्या अफवांचे भूत ह्यांच्या मानगुटीवर पक्के ठाण मांडून असते !त्यामुळे घरीच मृत्यू झाला तरी चालेल पण कोरोनाची टेस्ट करायचीच नाही व उपचार तर नकोच नको अशा वृत्तीचे हे नागरिक असतात.

या दोन्ही प्रकारच्या नागरिकात एक समानता आहे कि प्रशासनाने सांगितलेल्या त्रिसूत्रीचा ते अंमल करत नाही. ह्या दोन्ही प्रकारचे नागरिक कमी प्रमाणात आहेत पण ते समाजासाठी मोठे नुकसान दायक ठरत आहेत. लक्षात ठेवा, कोरोना झाल्यानंतर ८० टक्के रुग्णाना लक्षणे पण जाणवत नाही, १५ टक्के रुग्णाना हॉस्पिटल मध्ये जावे लागते तर ५ टक्के रुग्णाना अतिदक्षता गृहात उपचार घ्यावे लागतात व त्यातील १ ते २ टक्के रुग्णाचा मृत्यू होतो. पण ह्या प्रमाणात वाढ होऊ शकते. आपण प्रशासकीय सूचनाकडे दुर्लक्ष केले व लक्षणांच्या सुरुवातीच्या कालावधीत ( ५ दिवसांचा ) डॉक्टरांचा सल्ला न घेता घरीच आजार लपविला तर मात्र परिस्थिती हाताबाहेर जाते. म्हणून “नाजूक कोवळी मने व कमजोर पिवळी पाने “जपायची असतील तर अशा नागरिकांचे प्रबोधन करण्याची गरज आहे व त्यासाठी आपण सजग नागरिकांनी प्रयत्न केले पाहिजे.

                                                     -डॉ गीतांजली ठाकूर, डॉ नरेंद्र ठाकूर, सुखकर्ता फाउंडेशन, एरंडोल.

Protected Content