भुसावळात गीता जयंतीनिमित्त “गीतापठण” (व्हिडीओ)

Gitapathan pathan in bhusaval

 

भुसावळ प्रतिनिधी । येथील दूर्गा कॉलनीत गीता जयंतीनिमित्त गीतापठणाचे आयोजन करण्यात आले होते.

भगवंताच्या मुखातून गीता ही प्रकट झाली आहे. गीता वेदतुल्य आहे, किंबहुना वेदापेक्षाही बहुमूल्य आहे. गीतेत पुष्कळसे अध्यात्मशास्त्र आहे. असे प्रतिपादन ह.भ.प. चंद्रकांत महाराज साकरीकर यांनी येथे केले. गीतापठणानंतर चंद्रकांत महाराज म्हणाले की, गीतेमधून ज्ञान मिळवल्याने अज्ञान दूर होते. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांनी श्रीमद्भगवद्गीतेवर टीका करून लिहिलेला ज्ञानेश्वरी हा ग्रंथ असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, गीता हा एक अश्वमेध यज्ञ आहे. गीतेमध्ये असणारी जेवढे अक्षरे आहेत. तेवढे अश्वमेध यज्ञ गीता वाचन व श्रवणपठनाने होतात. संसारामध्ये भरकटलेल्या मनुष्यमात्राला गीता योग्य मार्गदर्शन करून सन्मार्गावर नेते. गीतेचा महिमा अनेक संतांनी वर्णन केलेला असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी ह.भ.प लक्ष्मण महाराज यांनीसुद्धा गीतेचे महत्व विविध उदाहरणे देऊन पटवून दिले.

गीतापठनात उषा पाटील, राधिका चौधरी, अरुणा सरोदे, सुरेखा बोंडे, अलका टोके, अनिता पाटील, सुनिता नेमाडे, प्रमिला नेमाडे, मंगला नेमाडे, लता नेहेते, रूपाली पाटील, विमल पाटील, निशा पाटील, भक्ती पाटील, श्रद्धा पाटील आदींनी सहभाग घेतला.

Protected Content