



भुसावळ प्रतिनिधी । ऑर्फन फ्री इंडीया अंतर्गत कुऱ्ह पानाचे येथील महात्मा गांधी वस्तीगृहातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना इनरव्हील क्लब भुसावळ तर्फे बेडसीट, बिस्कीट, कंपास, पेन्सीलसह शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी डिस्ट्रीक चेअरमन वैजयंती पाठक, पीएपी रश्मी शर्मा, डिस्ट्रिक आयएसओ विणा वाघेला, अध्यक्षा स्वाती देव, सचीव वंदिता पारे, क्लबच्या पीडीसी रत्नकांता अग्रवाल, राजेश्री कात्यायणी, शशीकला लाहोटी, शितल भराडीया सह सदस्या उपस्थित होत्या. या प्रसंगी क्लबच्या बँनरचे विमोचन झाले. वैजयंती पाठक यांनी विदयार्थ्याना मार्गदर्शन केले.


