हिंगोणा येथे घराला लागली आग

यावल प्रातिनिधी । तालुक्यातील हिंगोणा गावातील दत्त कॉलनीमधील रहिवासी शेतकरी पाटील यांच्या घराला सोमवारी सकाळी १० वाजता अचानक भीषण आग लागून जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या. आग भडकताच धुराचे लोळ उडाले. हा प्रकार लक्षात येताच नागरिकांनी एकच धावपळ करून मदत केली. 

अभिमान पाटील व यांचे कुटुंब सकाळी ६ वाजता शेतात कामाला गेले होते. त्यामुळे आग लागली, त्यावेळी घरात कोणीच नसल्याचे कळते. शेजारच्यांनी केली धावपळ घराला अचानक आग लागल्यामुळे परिसरातील रहिवाशांनी तात्काळ युद्धपातळीवर आग विझवण्याचा प्रयत्न केले. त्यांनी मिळेल तेथून पाणी आगीवर टाकुन नियंत्रण मिळवण्यासाठी शर्यतीचे पर्यंत केलीत.नागरिकांनी केलेल्या मदत कार्यामुळे आग आटोक्यात आली. घटनेबाबत तातडीने अभिमान पाटील यांना कळविण्यात आले. त्यांचे कुटुंब घरी आल्यानंतर त्यांनी घराची अवस्था पाहून रडायला सुरूवात केली. तेथील रहिवासी भगवान पाटील यांनी तात्काळ हिंगोणा येथील  तलाठ्यांना फोन करून आगीची माहिती देवुन घटनास्थळी बोलविले.

तहसीलदारांकडे पाठविला अहवाल 

तलाठी दिपक एच. गवई यांनी घटनास्थळी येऊन तात्काळ पंचनामा केला. त्या पंचनाम्यात जिवनावश्यक घरातील अत्यावश्यक वस्तू पूर्णत: जळून खाक झाल्या असून त्यांच्या घरातील आगीत झालेले अंदाजीत नुकसान ३६ ते ५० हजाराचे असावे,असा अंदाज व्यक्त करण्यात आला. हिंगोणा तलाठी गवई यांनी तात्काळ पंचनाम्याची प्रत तहसीलदार महेश पवार यावल यांना रवाना केली. या आगीत संपुर्ण संसार उघडल्यावर पडलेल्या शेतकऱ्यास तात्काळ मदत मिळेल, असे आश्वासन तलाठ्यां दिले.

 

Protected Content