दिपनगर येथे महात्मा फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण

bhuswal dipnagar

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील दिपनगर वीज निर्मिती ६०० मेगा व्हॅट प्रकल्पात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस ११ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या उपमुख्य अभियंता यांनी पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.

 

 

कार्यक्रमाप्रसंगी दिपनगर वीज निर्मिती ६०० मेगाव्हॅट प्रोजेक्ट ऑफिसमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार ११ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेला उपमुख्य अभियंता मोहन आव्हड यांनी अर्पण केला. त्यावेळी कार्यक्रमाला ६०० मेगाव्हेट दिपनगर वीज निर्मितीचे सर्व ऑफिस स्टॉप व अधिकारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. कार्यक्रमाची सुरुवात उपमुख्य अभियंता मोहन आव्हड, अधीक्षक अभियंता प्रितम देशकर तसेच ऑफिसचे कर्मचारी शेरुभैय्या घेते, सुप्नील पाटील व सर्वांनी पुष्प वाहून महात्मा फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

Add Comment

Protected Content