मोठी बातमी : राज्यात तब्बल २० हजार अंगणवाडी सेविकांची जंबो भरती !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्यात मे महिन्यापर्यंत २० हजार अंगणवाडी सेविकांची भरती करण्यात येणार असल्याची महत्वाची घोषणा आज मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली.

आज विधानसभेत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अंगणवाडी सेविकांबाबत महत्वाच्या घोषणा केल्या. यात प्रामुख्याने मे महिन्यापर्यंत राज्यात २० हजार सेविकांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी विधानसभेत दिली. अंगणवाडी सेविकांच्या वेतनात २० टक्के इतकी वाढ करण्यात येणार आहे. तसेच सेविकांना मोबाईल खरेदी करण्यासाठी मदत करण्यात येणार असल्याचेही मंगलप्रभात लोढा म्हणाले.

दरम्यान, अंगणवाडी सेवीकांच्या भरतीबाबत लोढा बोलत असतांना विरोधकांनी याला जोरदार विरोध केला. विरोधकांनी घोषणाबाजी करून सभात्याग केला.

Protected Content