डॉ.वर्षा पाटील वुमेन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन महाविद्यायातर्फे वृक्षारोपण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.वर्षा पाटील वुमेन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन महाविद्यायातर्फे एमआयडीसी परिसरात आज वृक्षारोपण करण्यात आले.

 

डॉ.वर्षा पाटील वुमेन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. नीलिमा वारके यांनी  झाडांचे अनन्य साधारण महत्व कसे आहे व वृक्षांचे संवर्धन ही काळाची गरज या विषयी संवाद साधला. यावेळी झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देण्यात आला. सदर  वृक्षारोपण जळगाव एमआयडीसी परिसरात झाला. यामध्ये प्रामुख्याने वड, पिंपळ, नीम इत्यादी झाडे लावली गेली. या कार्यक्रमास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content