महावितरण अभियंता मनोज पवार यांना वीज कर्मचाऱ्यांनी दिला अनोखा निरोप

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  अमळनेर महावितरणचे उपकार्यकारी अभियंता मनोज पवार यांची अमळनेर येथील प्रदीर्घ सेवेनंतर अमळनेर 2 उपविभाग येथून धुळे विभागीय कार्यालय येथे नुकतीच बदली झाली आहे. महावितरण वीज कर्मचारी यांनी अनोखा असा निरोप समारंभाचे आयोजन करून अनोखा निरोप दिला.

 

 

याप्रसंगी महावितरणचे अभियंता मनोज पवार यांचा सपत्निक मोठा सत्कार करण्यात आला.  एवढेच नाहीत पवार यांच्यावर फुलांची उधळण करीत भावपूर्ण निरोप दिला. या अनोख्या निरोप समारंभाने ते व त्यांचे कुटुंब भारावून गेले होते.  जून 2016 ते जुलै 2023 या काळात त्यांनी सलग ७ वर्षे यशस्वी रित्या अमळनेर येथे उपकार्यकारी अभियंता म्हणून काम पाहिले. यादरम्यान त्यांनी नेहमीच,शेतकरी बांधवांच्या समस्यांना प्राधान्य दिले. शिवाय कर्मचारी वर्गाशी देखील त्यांनी आपुलकीने तसेच मैत्रीपूर्ण संबंध जोपासले. यामुळेच मनोज पवार यांना आदर व आपुलकीने निरोप दिला म्हणून त्यांनी संपूर्ण तालुक्याचे आभार मानले.  दरम्यान अधिकारी कसा असावा याचे उत्तम उदाहरण अभियंता मनोज पवार यांचा रूपाने अमळनेर करांनी अनुभवला.

Protected Content