क्रीडा संकुलांच्या विकासासाठी ८.९७ कोटी रूपयांना मंजुरी

 

 

 

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  एरंडोल आणि पारोळा तालुक्यात क्रीडा संकुलांच्या विकासासाठी शासनाकडून ८ कोटी ९७ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले असून लवकराच कामांना सुरूवात होणार आहे

 

पारोळा एरंडोल दोनही तालुक्यातील तालुका क्रीडा संकुलांचे प्रश्न अनेक दशकापासुन प्रलंबित होते. दोनही शहरांसह तालुक्यातील क्रीडा प्रेमींना बंदीस्त व खुल्या खेळांसाठी इतर कुठेही मैदान व बंदीस्त इमारत उपलब्ध नसलेल्या क्रीडा प्रेमींची मोठीच गैरसोय होत होती.  दैनंदिन मैदानी तालिम, विविध भरत्यांसाठीच्या तालिम यांसारख्या विविध बंदीस्त व मैदानी खेळांसाठी क्रीडा संकुलाची मोठी गरज भासत होती. परंतु तालुक्याचा ठिकाणी असली कुठलीही सोयी-सुविधा उपलब्ध नसल्याने युवकांमध्ये प्रचंड नाराजीचा सुर कायमच होता. वर्षानुवर्षे क्रीडा प्रेमी बदल होण्यासाठी प्रतिक्षेत होते. युवकांना त्यांचा बंदीस्त व मैदानी खेळांसाठी तालुक्याचा ठिकाणी हक्काचे व्यासपिठ उपलब्ध व्हावे, यासाठी आमदार चिमणराव पाटील हे सतत प्रयत्नशिल होते.

 

सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या क्रीडा संकुलांचा इमारती धुळखात पडलेल्या होत्या. तेथे कुठलीही सोयी-सुविधा उपवब्ध नसल्याने खेळाडु व युवक त्याकडे पाठ करून होते. दोनही तालुक्यांचा क्रीडा संकुलांचा विषय अनेकदा वृत्तपत्रांचा व सोशल मिडीयाच्या माध्यमाने मांडण्यात आला. याची आमदार चिमणराव पाटील यांनी दखल घेत दिनांक ९ नोव्हेंबर २०२२ रोजी संबंधित अधिकाऱ्यांसह सद्यस्थितीत उभ्या असलेल्या इमारतींची पाहणी केलेली होती. यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी क्रीडा संकुलांचा विकासासाठी तातडीने प्रस्ताव शासन दरबारी सादर करण्याचा सुचना उपस्थित तालुका क्रीडा अधिकारी यांना दिल्या होत्या. शासन दरबारी सादर प्रस्तावाचा मंजुरीसाठी आमदार चिमणराव पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, क्रीडा व युवक कल्याणमंत्री गिरीशजी महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांचेकडे वेळोवेळी पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्याच पाठपुराव्याने महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडुन पारोळा तालुका क्रीडा संकुलाचा विकासासाठी ४.२० कोटी व एरंडोल तालुका क्रीडा संकुलाचा विकासासाठी ४.७६ कोटी रूपयांना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.

 

यासाठी आता पारोळा क्रीडा संकुल विकासासाठी १ कोटी तर एरंडोल क्रीडा संकुल विकासासाठी ५० लक्ष एवढा निधी वितरीत करण्यात आला आहे. या मंजुरीच्या अनुषंगाने पारोळा व एरंडोल तालुका क्रीडा संकुलांचा विषय मार्गी लागल्याने क्रीडा प्रेमींसाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. त्यासाठी आमदार चिमणराव पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, क्रीडा व युवक कल्याणमंत्री गिरीशजी महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांचे आभार मानले आहेत. तसेच या दोनही क्रीडा संकुलांचा कामाला लवकरच सुरूवात करण्यात येणार असुन क्रीडा प्रेमींसाठी शक्य तितक्या लवकर क्रीडा संकुल खुले करण्यात येणार असल्याची माहीती आमदार चिमणराव पाटील यांनी दिली.

Protected Content