नांद्रा येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

पाचोरा-लाईव्‍ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या धडाडीच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांनी नांद्रा ता. पाचोरा येथे नि:शुल्क मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले होते.

प्रथमतः दीपप्रज्जवलाने शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. पाचोरा व भडगाव तालुक्यातील अनेक ठिकाणी वैशाली सुर्यवंशी यांनी मोफत मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करून वयोवृद्ध व्यक्तींना नवी दृष्टी प्रदान करण्याचा एक संकल्पच हाती घेतला आहे. हा संकल्प ते पुढे अविरत चालू ठेवून सामाजिक बांधिलकी जोपासणार आहेत. १५ मार्च रोजी नांद्रा तसेच परिसरातील ज्या लोकांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट आहे अशा गरजू लोकांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करून या शिबिरात सुमारे ३१० रुग्णांची तपासणी जळगाव येथील नेत्रचिकित्सक डॉ. विष्णू पाटील व डॉ. विनोद पाटील यांनी केली . त्यातील सुमारे ७० रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी जळगाव येथील कांताई नेत्र चिकित्सालय या ठिकाणी पाठविण्यात आले. रुग्णांची तपासणी, जळगाव येथे येण्या – जाण्याचा तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च वैशाली सुर्यवंशी करीत आहेत.

याप्रसंगी शेतकरी नेता तालुका प्रमुख रमेश बाफना, राजेंद्र पाटील, राजेंद्र सूर्यवंशी, उपजिल्हा संघटक विनोद पाटील, पत्रकार यशवंत पवार, पिंपळे महाजन (वेरूळी), तालुका प्रमुख शरद पाटील, युवासेना उपजिल्हाप्रमुख संदीप जैन, प्रणय रणदिवे, प्रवीण पाटील (सामनेर), विनोद पाटील (माहेजी), कैलास पाटील (आसनखेडे), रवी पाटील (लासगाव), नितीन पाटील (दुसखेडे), मा. उपसरपंच सखाराम पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष पाटील, सरपंच विनोद सावळे, पोलिस पाटील किरण तावडे, शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष किरण सोनार, भूषण तावडे, हिलाल बाविस्कर, नंदेश्वर पाटील, रामचंद्र धनगर (कुरंगी), सुनील पाटील, अरविंद पाटील, समाधान पाटील उपस्थित होते.

Protected Content