जळगावातील स्वामी समर्थ केंद्रात बरखास्त ट्रस्टचा मनमानी कारभार

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी ।  जळगाव शहरातील प्रतापनगर येथील स्वामी समर्थ केंद्राचा कारभार रामभरोशे सुरु असून तेथे बरखास्त झालेल्या ट्रस्टचे दोन सदस्य मनमानी कारभार पाहत आहेत. तेथे श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक व सांस्कृतिक केंद्र, जळगाव असा स्वतंत्र ट्रस्ट असतानाही तेथे घटनेप्रमाणे गेल्या ३० वर्षांपासून कुठलीही निवडणूक घेण्यात आलेली नव्हती, अशी माहिती सभासदांनी रविवारी २५ जून रोजी पत्रकार परिषदेत दिली आहे.

 

स्वामी समर्थ सेवा केंद्राचे सभासद नितीन पृथ्वीराज चव्हाण, मधुकर भीमराव पाटील, रविंद्र शंकर कदम यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक व सांस्कृतिक केंद्र, जळगाव या नावाने १९८८ साली स्वतंत्र ट्रस्ट जळगावात प्रताप नगर येथे स्थापन करण्यात आला आहे. हा ट्रस्ट स्वतंत्र असून, कोणत्याही न्यासाशी, सभासदत्वाचा, कार्यभाराचा किंवा आशीर्वादाचा असा कोणताही संबंध नाही. कोणत्याही १९८८ सालीच ट्रस्टची घटना निर्माण करण्यात आली. घटनेनुसार ९ सदस्यांची कार्यकारिणी निवड झाली होती. आज रोजी सहा संचालक मयत आहेत.  तर एका सदस्यांनी राजीनामा दिला आहे.

 

ट्रस्टचे उर्वरित २ सदस्य भरतसिंग मोहनसिंग पाटील हे सध्या स्वयंघोषित अध्यक्ष तर रमेश बाबुराव परदेशी हे स्वयंघोषित उपाध्यक्ष म्हणून मनमानी कारभार पाहत आहेत, अशी माहिती नितीन चव्हाण यांनी दिली आहे. दर पाच वर्षांनी निवडणूक घ्यावी असे ट्रस्टच्या घटनेत नमूद असतानाही १९९३ पासून आजवर कुठल्याच प्रकारची निवडणूक घेण्यात आली नव्हती.  याबाबत नितीन चव्हाण, रविंद्र कदम, मधुकर पाटील यांनी धर्मदाय आयुक्तांकडे प्रकरणे दाखल केली. या सर्व प्रकरणांचा निकाल मधुकर पाटील व इतरांच्या बाजूने लागलेला आहे.

Protected Content