जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिवसानिमित्त सोमवारी व्यसनमुक्ती दिंडी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त सोमवार दि. २६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता चेतना व्यसनमुक्ती केंद्रातर्फे व्यसनमुक्ती दिंडी आयोजित करण्यात आली आहे. दिंडीला नागरिकांसह विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.

 

महाराष्ट्रामध्ये व्यसनांचे प्रमाण हे अत्यंत वाढत चालले आहे, ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे अनेक संसाराची राखरांगोळी होत असून, गुन्हे देखील वाढत आहेत. समाज व्यसनमुक्त व्हावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून चेतना व्यसनमुक्ती केंद्र महाराष्ट्रभर कार्यरत आहे. २६ जून हा जागतिक अमली पदार्थ विरोधी दिवस म्हणून जगभर पाळला जातो.ह्या दिवशी छत्रपती शाहू महाराज यांचीहि जयंती आहे.

 

हा दिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. या दिवसानिमित्त चेतना व्यसनमुक्ती केंद्रातर्फे व्यसनमुक्तीची दिंडी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. दिंडीमध्ये व्यसनामुळे होणारे तोटे तसेच संसाराची होणारी राख रांगोळी कशी होते याबाबत सादरीकरण केले जाणार आहे.

 

दिंडी  सकाळी १० वाजता शिवतीर्थ मैदानावरून निघणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एम. राजकुमार उपस्थित राहणार आहे.  शाळेतील विद्यार्थी, समाजातील अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

Protected Content