आत्मनिर्भर महिला संस्थेच्या प्रशिक्षण शिबिराचा समारोप

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आत्मनिर्भर पहिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे आयोजीत केलेल्या शिबिराचा आज समारोप करण्यात आला.

 

आत्मनिर्भर महिला बहुउद्देशीय संस्था तर्फे ११ जून पासून आयोजिका अर्चना पाटील यांनी  ब्युटी पार्लर प्रशिक्षण तसेच मेहंदीचे मोफत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते त्याचा आज समारोप कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार राजू मामा भोळे, उपस्थित पाहुणे नगरसेवक कैलास सोनवणे, माजी महापौर सीमाताई भोळे, नगरसेविका रंजनाताई वानखेडे, रंजनाताई सपकाळे, नगरसेविका हे उपस्थित होते.

 

या मोफत ब्युटीपार्लर प्रशिक्षण तसेच मेहंदीचे  प्रशिक्षण शिबिरामध्ये ६५० महिलांनी सहभाग घेतला या सहभाग घेतलेल्या महिलांना प्रमाणपत्र व गिफ्ट वाटप करण्यात आले आणि  प्रशिक्षक जयमाला वराडे, कोमल होले, दीपमाला सोनवणे, अश्विनी पाठक, सीमा कासार, संगीता चौधरी, पूनम महाजन, वर्षा राणे, वैशाली कोळी, भाग्यश्री शिंपी, वैशाली कोळी, तेजस्विनी बोंडे यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार प्रमुख  पाहुणे आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला.

 

यावेळी  कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार राजू मामा भोळे, उपस्थित पाहुणे माजी नगरसेवक कैलास सोनवणे, माझे महापौर सीमाताई भोळे, नगरसेविका रंजनाताई वानखेडे, रंजनाताई कोळी नगरसेविका, वानखेडे सर, संजय पाटील, गुणवंतराव झोपे, ललित चौधरी,चैतन्य कोल्हे, भूषण भोळे, अमेय राणे, मुविकोराज कोल्हे, राहुल तळेले उपस्थित होते.

Protected Content