जळगावात बंद घर फोडले; 5 हजारांचा ऐवज लंपास

Crime newss

जळगाव प्रतिनिधी । नातेवाईकांच्या तब्बेत बरी नसल्याने त्यांना पाहण्यासाठी गेलेल्या दाम्पत्याचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री फोडून कपाटातील पाच हजार रूपये आणि व काही चिल्लर चोरून नेल्याची घटना आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.

याबाबत माहिती अशी की, गिरधारी शांताराम गरूड (वय-30) रा. इंद्रनिल सोसायटी, खोटे नगर हे पत्नीसह हिम्मत जाधव यांच्या भाड्याच्या खोलीत राहतात. ते सोनी ट्रेन्डस कॉम्प्यूटर ऑपरेटींगचे काम करतात. भुसावळ येथील सासरे यांचे डोळ्यांचे ऑपरेशन झाल्याने त्यांना पाहण्यासाठी पत्नीसह रविवारी दुपारी 4 वाजता घराला कुलूप लावून गेले होते. दरम्यान, मध्यरात्री रात्री 2 ते 3 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत घरातील लोखंडी कपाट तोडून सामान अस्तव्यस्त केले. विशेष म्हणजे त्यांनी घरात असलेला विळ्याच्या सहाय्याने कपाट तोडला होता. यावेळी कपाटातील सामान अस्तव्यस्त करून फेकले होते. चोरी करण्यापुर्वी चोरट्यांनी घरमालक आणि शेजारी राहणारे रहिवशी यांच्या घराला बाहेरून कडी लावली होती. कपाटातील 5 हजार रूपये रोख व काही चिल्लर चोरून लंपास केला होता. आज सकाळी गिरधारी गरूड यांना मालक हिम्मत जाधव यांनी चोरी झाल्याने फोनद्वारे कळविले. दरम्यान, गिरधारी गरूड यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content