पहूर येथे बंद घर फोडले ; सलग दुसऱ्या दिवशी चोरी

पहूर ता. जामनेर प्रतिनिधी । पहूर येथील संतोषी माता नगरात बंद घराचे कुलुप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोने, चांदीच्या शिक्क्यांसह चार हजार आठशे रूपयांची रोकड चोरून नेल्याची घटना आज उघडकीस आली आहे. दरम्यान, शहरात सलग दुसऱ्या दिवशी चोरी झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि पहूर पेठ येथील संतोषी माता नगर येथील रहिवासी विजय सुधाकर चौधरी हे 16 सप्टेंबर 2021 रोजी कुटुंबासह कार्यक्रमा निमित्त धुळे येथे गेले होते. व राहते घराची चावी लहान बंधू राजेंद्र सुधाकर चौधरी यांचेकडे देऊन गेले होते. आज दिनांक 18 सप्टेंबर 2021 रोजी मी पहूर कडे येत असतांना पाचोरा जवळ असतांना  सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घराचे कुलूप नसुन घराच्या कडी कोयेंडा तोडून घरातील सामान अस्ताव्यस्त पडले आहे असा फोन आला. अज्ञात चोरट्यांनी रोख 4800 रूपयांसह, सोने, चांदी चे शिक्यांसह एकुण 21800 रूपयांची चोरी केली असून याबाबत विजय सुधाकर चौधरी यांनी पहूर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादी वरून गु. र.नं.338/2021,भा. द.वि. 380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे. काॅ. प्रकाश पाटील करीत आहे.

सलग दुसऱ्या दिवशी चोरी 

काल पहूर येथील पेट्रोल पंपावर उभ्या ट्रकमधून 26 हजार रूपये किंमतीचे साखरेचे 14 कट्टे चोरांनी लंपास केल्याची घटना घडली होती. तसेच हिवरी दिगर येथील किराणा दुकानातून 10 हजार रूपयांची रोकड लंपास केल्याची घटना काल घडली होती. याप्रकरणी अज्ञात चोरा विरूध्द पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना होत नाही तोच आज संतोषी माता नगर येथील विजय चौधरी यांच्या बंद घराचे कडी कोयेंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. पहूर पोलीस स्टेशनचे अंतर्गत चोर्याचे प्रमान वाढत आहे. तसेच गेल्या महिन्यात पहूर पोलीस स्टेशनचे हाकेच्या अंतरावर असणार्या अनिल कोटेचा यांच्या घरा बाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे फोडून दरवाज्याचे कुलूप तोडून रोकड तसेच सोन्या, चांदीच्या दागिण्यांसह तब्बल साडे सतरा लाखांचा दरोडा पडला होता. त्याचा तपासही अद्याप लागला नसल्याने पोलीसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण होत आहे. वरील सर्व चोरीचा तपास लावण्यासाठी पोलीस प्रशासनास आव्हान आहे. तसेच वाढत्या चोर्याचे प्रमाण कमी करण्यासाठी रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

 

Protected Content