जमडी येथे सर्पमित्र कदम यांनी पकडले नाग-नागीण (व्हिडीओ)

kadam

 

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील जामडी शिवारातील चतूरसिंग परदेशी यांच्या शेतातील घरात दोन विषारी नाग (दि.८) रोजी दुपारी दिसल्याने एकच खळबळ उडाली. यानंतर तात्काळ सर्पमित्र मयुर कदम यांना बोलविण्यात आले आणि त्यांनी अडचणीत बसलेले विषारी नागाचे जोडपे मोठ्या शिताफीने पकडले आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, चतूरसिंग परदेशी (कोतवाल हातले तलाठी कार्यालय) यांच्या शेतातील घरात हे दोन विषारी नाग दिसल्याने त्यांनी लगेच हे माहिती जामडी ग्रा.प.सदस्य दिपकसिंग राजपुत यांना दिली. त्यांनी लगेच येथील सर्पमित्र मयुर कदम यांना बोलावून सर्व हाकीकत सांगितली. कदम यांनी खुप वेळा मेहनत करुन विषारी नागाचे जोडपे पकडण्यात त्यांना यश आले असून कदम यांनी हे नागाचे जोडपे पकडुन सुखरुप जंगलात सोडुन दिले आहे.

विषारी नाग यांचे आपसात भांडण सुरु होते. आणि ते अतिशय चिडलेले असल्याने ग्रामस्थ देखील भयभीत झाले होते. त्यांना पकडणे गरजेचे होते. मात्र कुठलेही सर्पमित्र कमी वेळेत येवुन नाग पकडतील, अशी अपेक्षा ग्रामस्थांना नव्हती. पण फोन केल्यावर दुपारी ३ वाजेच्या सुमारास अगदी २० मिनीटात सर्पमित्र मयुर कदम (मो.नं.९१५८२४१६८५) तेथे पोहोचले व नागाचे जोडपे पकडले. त्यामुळे ग्रामस्थांनी देखील समाधान व्यक्त केले.

सर्पमित्र कदम यांचे सर्वत्र कौतुक होत असून दिपकसिंग राजपुत, भगवान परदेशी, सागर परदेशी, प्रदीप परदेशी, गयास पटेल, लतीफ कुरेशी, सुकलाल मोची, चतूरसिंग परदेशी यांनी सर्पमित्र मयुर यांचे आभार मानले आहे.

Protected Content