डोंगरी नदीत वाहून गेलेल्या ‘त्या’ तरूणाचा मृतदेह आढळला

चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील गोरखपूर तांडा येथील २५ वर्षीय तरूण हो शेतात जात असतांना डोंगरी नदीत वाहून गेल्याची घटना आज उघडकीला आली आहे. तालुक्यातील बत्तीशा शिवारात तरूणाचा मृतदेह आढळून आला आहे.

याबाबत माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील गोरखपूर तांडा येथील सोमनाथ रामजी राठोड (वय- २५) हा तरूण सकाळी सुमारास शेतात गेलेला असताना गावालगत असलेल्या डोंगरी नदीच्या पात्रात वाहून गेल्याची घटना आज बुधवारी २९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान सदर घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दरम्यान वाहून गेल्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह ओमकार सुतार, भगवान माळी, पी.एन.ठाकूर, भगवान पाटील आदी पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने पथकाने शोध कार्य सुरू केले असता तालुक्यातील बत्तीशा गावाच्या शिवाराजवळ मयत सोमनाथ राठोडचा मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content