किरकोळ कारणावरून तिघांनी एकाला मारहाण

Crime 1

जळगाव प्रतिनिधी । लग्नात नाचतांना अंगावर स्प्रे उडाल्याने राग येवून एकाला तिघांना बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली होती. याप्रकरणी शनिवारी रात्री उशीरा तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, राजेंद्र फकीरा पवार (वय-54) रा. श्रीकृष्ण नगर, जळगाव हे नातेवाईकांकडे 7 डिसेंबर रोजी हळदीचा कार्यक्रम सुरू असतांना अंगावर स्प्रे मारला. स्प्रे अंगावर पडल्याचा राग येवून बापू महादू पाटील, राहूल बापू पाटील आणि नाना पाटील या तिघांनी राजेंद्र पवार याच्या तोंडाला दगड मारून गंभीर जखमी केले. त्यांना खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी शनिवारी 8 डिसेंबर रोजी रात्री उशीरापर्यंत शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. प्रशांत देशमुख करीत आहे.

Protected Content