ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते कॉ. देशमुखांचा सत्कार !

जळगाव (प्रतिनिधी) “अरे माणसा – मानसा कधी होशील तु माणूस” अशी शिकवण देणाऱ्या कवियत्री बहिनाबाई चौधरी यांच्या आसोदा या माहेरच्या गावात आयोजित जाहिर सभेत मानुसकी व संवेंदनशिलतेचा परिचय देत सहकार राज्यमंत्री तथा शिवेसना उपनेते गुलाबराव पाटील यांनी सुरक्षारक्षक पोलिस कॉन्स्टेबल तथा सैन्य दलातील माजी सैनिक हंसराज देशमुख यांचा जन्मदिना चे औचित्य साधून त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार करून अभिष्ठचिंतन केले.

हंसराज लक्ष्मण देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल हे 1996 ते 2014 पर्यंत मराठा बटालियन या सैन्यदलात देशाच्या सुरक्षेसाठी 20 वर्ष सेवेत होते.त्यानंतर सन 2014 पासून ते जळगाव पोलीस दलात कार्यरत आहे.सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे पोलिस सुरक्षारक्षक म्हणून 2 वर्षापासून सेवेत आहे.कॉन्स्टेबल देशमुख यांच्या सत्कारावेळी उपस्थित युवकांनी भारत माता की जय ! वंदे मातरम ! जय जवान – जय किसान च्या घोषणा दिल्या त्यामुळे उपस्थित ग्रामस्थ भारावून गेला होते.

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी गटनेते विश्वनाथ पाटील, नवलसिंग राजे पाटील , उमेश पाटील, तुषार महाजन, किशोर चौधरी, सचिन चौधरी, ए .एस. आय. सुभाष चौधरी , पोलीस कॉन्स्टेबल अनिल धनगर, जितेंद्र पाटील, गोपाळ पाटील, शिवाजी सुतार यांच्यासह पोलीस कर्मचारी अन्य मान्यवर उपस्थित होते.

या सत्काराने पोलीस कॉन्स्टेबल व माजी सैनिक हंसराज देशमुख हे भारावून गेले. राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे व्यस्त व धावत्या वेळापत्रकातही सर्वसामान्य शिवसैनिक पासून ते सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांचा वाढदिवस न चुकता साजरा करत असतात तसेच त्यांच्या सुख दुःखात ही सर्वोतोपरी मदतीचा हात पुढे करीत असतात .

Add Comment

Protected Content