डॉ. कलाम इनोव्हेशन सेंटरतर्फे उद्या पक्षी निरीक्षणावर स्लाईड शो

IMG 20191201 WA0012

जळगाव, प्रतिनिधी | येथील आशा फौंडेशन संचालित डॉ. एपीजे अब्दुल कलाम इनोव्हेशन सेंटरच्यावतीने रविवार, दि. ८ डिसेंबर रोजी सकाळी १० ते १२ वेळात पक्षी निरीक्षणावर स्लाईड शोचे आयोजन करण्यात आले आहे.

आशा फौंडेशन संचालित डॉ. एपीजे अब्दुल कलाम इनोव्हेशन सेंटरच्यावतीने आयोजित पक्षी निरीक्षणात पक्षीमित्र शिल्पा गाडगीळ उपस्थितांना पक्ष्यांची माहिती स्लाईड शोद्वारे सांगणार आहेत. तसेच चित्रफीतही दाखवून पक्षी व निसर्ग संवर्धनाविषयी मार्गदर्शन करणार आहेत. मागील रविवारी दि. १ डिसेंबर रोजी सेंटरतर्फे मेहरुण तलावावर विद्यार्थ्यांना स्थलांतरित व स्थानिक पक्षी निरीक्षण सफर आयोजित करण्यात आली होती. पक्षीमित्र व वन्यजीव संरक्षण समितीचे राजेंद्र व शिल्पा गाडगीळ तसेच बाळकृष्ण देवरे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना छोटा पाणकावळा, गाय बगळा, छोटा बगळा, ढोकरी, हळदी-कुंकू बदक, वारकरी, नदी सुरय, शेकाट्या, वटवट्या, बुलबुल, कोतवाल, पारवा, सुतार, खंड्या, निळ्या शेपटीचा वेद राघू आदी पक्षी दाखविण्यात आले. प्लास्टिक, थर्माकोल आदींचा पर्यावरणावर तसेच पक्षी-प्राणी जगतावर होणार परिणाम याचीही माहिती देण्यात आली. याप्रसंगी निवडक विद्यार्थी उपस्थित होते. दरम्यान, पक्षी निरीक्षणावर स्लाईड शो हा आशा फौंडेशनच्या महाबळ कॉलनीमधील कार्यालयात होणार असून जास्तीत जास्त विद्यार्थी, शिक्षक, पालक-पाल्य व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन समन्वयक वर्षा महाशब्दे यांनी केले आहे.

Protected Content