मुंबई येथे कारच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यु

Accident

 

मुंबई वृत्तसंस्था । भरधाव वेगात असलेल्या कारने रस्त्यालगत चालणाऱ्या तरूणीला धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, यात महिलेचा जागीच मृत्यु झाला आहे. मुंबईतील चुनाभट्टी परिसरात ही घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कारमध्ये एकूण ४ तरुण होते आणि ते मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सांगितले जात आहे. मद्यधुंद अवस्थेत असल्याने कारवरील ताबा सुटल्याने त्यांनी रस्त्यालगत चालणाऱ्या तरूणीला धडक दिली गेली. यात महिलेचा मृत्यु झाला आहे. अर्टना पोर्टे असे मृत तरुणीचे नाव आहे. जो पर्यंत दोषींवर तत्काळ कारवाई होत नाही, तो पर्यंत तरुणीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा मृत मुलीच्या कुटुंबीयांनी घेतला आहे. दरम्यान, पोलिसांनी चौघांपैकी ३ आरोपींना अटक केली आहे.

Protected Content