शहरात पुन्हा एकदा खून : तरूणाला भोसकून संपविले

Jalgaon News जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शहरातील खुनांची मालिका संपण्याचे नाव घेत नसून पुन्हा एकदा तरूणाची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे.

शहरात खुनांचे सत्र सुरू झाल्याचे दिसून येत आहे. मध्यंतरी यात थोडा विराम आल्यासारखे वाटत असतांनाच दोन दिवसांपूर्वी शिव कॉलनीत एका तरूणावर वार करून त्याला संपविल्याने जळगाव हादरले होते. यानंतर शहराला पुन्हा एकदा हादरा बसला आहे.

काल मध्यरात्रीच्या नंतर शहरातील निवृत्ती नगरात राहणार्‍या भावेश उत्तम पाटील ( वय २८ ) या तरूणावर अज्ञात हल्लेखोरांनी तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. दरम्यान, हा हल्ला नेमका कुणी केला याची माहिती समजू शकली नाही. रात्री उशीरापर्यंत या संदर्भात शहर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

जळगावातल्या शिव कॉलनीत खून झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी यावल तालुक्यात एकाची हत्या झाली. यानंतर दुसर्‍याच दिवशी जळगावात पुन्हा खून झाला. म्हणजे लागोपाठ तिसर्‍या दिवशी हत्या झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक संपला की काय ? अशी स्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

Protected Content