सलून आणि जिम सुरु करण्यास परवानगी ; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) राज्य सरकारने येत्या रविवारपासून म्हणजे 28 जूनपासून सलून आणि जिम सुरु करण्यास परवानगी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला.

 

एकीकडे अन्य व्यवसायांना परवानगी दिली असताना, सलून व्यवसायाला परवानगी का नाही असा सवाल नाभिक समाज आणि सलून व्यावसायिकांनी विचारला होता. कोरोना काळातील लॉकडाऊन आणि अनलॉकिंगनंतर हळूहळू बहुतेक सेवा पूर्ववत होत आहेत. मात्र महाराष्ट्रातील सलून व्यवसाय अद्याप बंद आहेत. ही सेवा नियम-अटींसह सुरु करु द्यावी, अन्यथा नाभिक समाज आणि सलून व्यावसायिकांनी हायकोर्टात याचिका दाखल करण्याची तयारी केली होती. परंतू आता सलून सुरु करण्याचा निर्णय राज्य सराकरने घेतला आहे. 28 जूनपासून महाराष्ट्रातील सलून सुरु होणार आहेत. दरम्यान, लॉकडाऊनमधील अर्थिक संकटामुळे राज्यभरात पाच सलून व्यावसायिकांनी आत्महत्या केल्या आहेत.

Protected Content