पाचोरा तालुक्यातील भोजे येथील रेशन दुकानाचा परवाना रद्द

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शासन मान्य स्वस्त धान्य दुकानासंदर्भात विविध तक्रारींची दखल घेत भोजे ता. पाचोरा येथील रेशन दुकानाचा परवाना अखेर कायमस्वरूपी रद्द करण्यात आला असल्याचा आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांनी आदेश पारीत केला आहे.

याबाबत प्राप्त माहिती अशी की, “भोजे तालुका पाचोरा येथील शासन मान्य स्वस्त धान्य दुकान हे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी भोजे यांना परवाने देऊन सुरू होते. सदर विकास सोसायटीच्या स्वस्त धान्य दुकानाचे सेल्समन याचा गैरकारभार व धान्याचा पुरवठा लाभार्थ्यांना सुरळीत न देणे, पावत्या न देणे, रेशन दुकानात उपलब्ध मालाचा दर्शनी भागात बोर्ड नसणे, लाभार्थ्यांची नावे दर्शनी भागात न लावणे, भाव फलक व मालाचा सॅम्पल दुकानाच्या दर्शनी भागात नसणे, यासह अनेक तक्रारी भोजे येथील उच्च शिक्षित उद्योजक व सामाजिक कार्यकर्ता निलेश उभाळे यांनी पुराव्यासह एप्रिल २०२० ला राष्ट्रीय मानवाधिकार आयोग दिल्ली, उपलोकायुक्त महाराष्ट्र राज्य, प्रधानमंत्री कार्यालय दिल्ली, राष्ट्रपती कार्यालय दिल्ली, कार्यालयांमध्ये तक्रारी दाखल केल्या होत्या.

जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यासह वरिष्ठ याची दखल घेत चौकशीअंती व पंचनामा, सबळ पुराव्या नुसार जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी भोजे येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे रेशन दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला असल्याचा आदेश पारित केला आहे.

यामुळे पाचोरा तालुक्यातील रेशन दुकानदारांचे धाबे दणाणले आहे. तक्रारदार निलेश उबाळे यांनी सांगितले की गैरकारभार होत असलेल्या स्वस्त धान्य दुकानात मालाची विल्हेवाट व ठरवून दिलेल्या अटी शर्तीचा भंग करून ग्राहकांची लूट होत असल्याने तक्रार केली होती.

Protected Content