कोरोना : जनार्दन स्वामींचे सर्व आश्रम ३१ मार्चपर्यत राहणार बंद

पारोळा, प्रतिनिधी । कोरोना विषाणूच्या संसर्ग व वाढते प्रमाण लक्षात घेऊन जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगीरीजी महाराज यांचे उत्तराधिकारी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज आश्रम वेरूळ ता.रत्नपूर(खुलताबाद) जि.संभाजीनगर (औरंगाबाद) १८ ते ३१ मार्च दरम्यान, बंद ठेवण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला आहे.

जगभरामध्ये थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या संसर्ग व वाढते प्रमाण व महाराष्ट्रातील कोरोना विषाणुबाधितांची वाढती संख्याचा विचार लक्षात घेता तसेच राज्य व जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून गर्दीच्या ठिकाणे नियंत्रित करण्यावा निर्णय घेऊन सर्व धार्मिक स्थळांना गर्दी व दर्शन बंद करण्याचे केलेल्या आवाहन केले होते. याला प्रतिसाद व एक सामाजिक जबाबदारी म्हणून विश्वस्त मंडळ व आश्रम व्यवस्थापनाने दि. १८ ते ३१ मार्चपर्यंत सर्व आश्रम व मंदिर दर्शन,प्रसादालय,भक्त निवास व आश्रम परिसरबंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तरी सर्व जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगीरीजी महाराज यांचे उत्तराधिकारी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज आश्रम वेरूळ ता.रत्नपूर (खुलताबाद) जि.संभाजीनगर (औरंगाबाद) येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांनी याची नोंद घ्यावी व विश्वस्त मंडळ व आश्रम व्यवस्थापनाससहकार्य करावे असे आवाहन केले आहे.

Protected Content