चोपड्यात कलम 370 निर्णयाचा भाकपतर्फे निषेध

ARTICLE 370 1

चोपडा प्रतिनिधी । भाजप सरकारने नुकतेच जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द केले आहे.एवढेच नव्हे तर, जम्मू काश्मीरची फाळणी करून इंटरनेट सेवा बंद केली. या निर्णयाचा जळगाव जिल्हा भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे नुकताच निषेध करण्यात आला.

याबाबत माहिती अशी की, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या बैठकीत चर्चा झाली की, जम्मू काश्मीर सारख्याच जवळजवळ 10 / 11 तरतूदी इतर राज्यांनाही लागू करण्यात आल्या आहेत. तेथील जनतेचे हितरक्षण संविधानाने केले आहे. सरकारने हा निर्णय जनतेच्या इच्छेविना जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभेच्या समंतीविना तसेच तेथील सर्व पक्षांचे विचार ऐकून घेतला आहे. शिवाय संसदेतील बहूमताचा गैरवापर करून सरकारने 370 कलम रद्द केले व संविधानाचा मूडदा पाडला आहे.

डावे पक्ष याविरोधात लढत असून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस कॉ.डी राजा व मार्कसवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस कॉ. सिताराम येचूरी यांना जम्मूत कार्यकर्त्यांना भेटण्यापासून सरकारने रोखले. या निर्णयाचा जळगाव जिल्हा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. अमृतराव महाजन, जिल्हा सचिव ज्ञानेश्वर पाटील, लक्ष्मण शिंदे कालू कोळी, गोरख वानखेडे, विठ्ठल बडगुजर, जे.डी ठाकरे, अरूणा काळे, देविदास बोंदार्डे यांनी निषेध केला आहे.

Protected Content