मग आम्ही आसामला राहायला जातो-मनोज जरांगे

जालना-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आमचा आरक्षणासाठी लढा सुरु आहे. आम्हाला मुंबईला जाण्याची हौस नाही, आंदोलकांना सरकारने अडवले किंवा त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मुंबईत जाणारे धान्य, दूध बंद करु, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. तर आमचा गॅस बंद केला तर लाकडे पेटवू, तसेच त्यांनी आपण 20 जानेवारीला मुंबईत आंदोलनाला जाण्यावर ठाम आहोत, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

दरम्यान मनोज जरांगे पुढे बोलताना म्हणाले की, त्यांनी आमच्या गाड्यांना डिझेल दिले नाही, त्यांनी आम्हाला गॅस घेऊ दिला नाही, आमचे नेट बंद केले, आम्हाला तेल-मीठ घ्यायचे दुकानं बंद केले, तरी आम्ही बिगर डिझेलवर गाड्या चालवण्याची तयारी केली आहे. हे कोणालाच माहिती नाही. तिथे बिगर डिझेलच्या गाड्या दिसतील. त्यांनी गॅस बंद केला तर आम्ही चूल पेटवू. पण तुमचे दूध बंद होणार.

मनोज जरांगे म्हणाले की, आमचा मायबाप मराठा शेतकरी तुम्हाला दूध देणार नाही. आम्ही इकडे त्याचे तूप, दही करु, पण तुम्हाला देणार नाही. तुम्ही बाजरी, गहू खायचेच नाहीत, ते सुद्धा देणार नाहीत. सोयाबीनही देणार नाही. आम्ही दाळी देणे बंद करु. तुम्ही त्या टोपल्याच्या काड्या काढायच्या आणि त्या खायच्या. तुम्हाला दुसरा चान्सच नाही. तुम्ही आम्हाला जसा त्रास द्याल, तसा तुम्हाला त्रास होईल.

मनोज जरांगे म्हणाले की, मुंबईत नाही घुसू देणार म्हणजे काय? मुंबई फक्त त्यांची एकट्याची आहे का? मुंबई आमचीसुद्धा आहे. मुंबई महाराष्ट्राची आहे. तिथे सर्व देशातील काळे-पांढरे लोकं येतात. आम्ही काय महाराष्ट्रातले आहोत, आम्हाला बघू द्यायचं नाही का कुणाचे घर कसे, विमान कसे, कोणाच्या कंपन्या कशा आहेत, मंत्रालय कसे असते, आम्हाला बघायला यायचे आहे. आमची मुंबई आहे. त्यांनी सांगावे की, तुम्ही महाराष्ट्रातले नाही, मग आम्ही आसामला राहायला जातो.

Protected Content