खुशखबर! पंतप्रधानांनी आफ्रिकेतून आणलेल्या मादी चित्याने दिला तीन पिल्लांना जन्म

भोपाळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा |मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमधून एक आनंद वार्ता आली आहे. यामध्ये आशा या मादी चित्त्यानं तीन बछड्यांना जन्म दिला आहे. या तिन्ही बछड्यांचा व्हिडिओ केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी शेअर केला आहे. या बातमीमुळं सरकारच्या चित्ता संवर्धनाच्या मोहिमेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

केंद्रिय मंत्री भुपेंद्र यादव यांनी या बछड्यांचा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये म्हटलं की, “जंगलात गुरगुरनं ऐकू आलंय! कुनो नॅशनल पार्कमध्ये तीन नवीन सदस्यांचे स्वागत झालंए, हे सांगताना आनंद होत आहे.

नामिबियातील मादी चित्ता आशानं या पिल्लांना जन्म दिला आहे. पर्यावरण संतुलनासाठी पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वप्न पाहिलेल्या चित्ता प्रकल्पासाठी हे एक मोठं यश आहे. प्रकल्पात सहभागी सर्व तज्ज्ञ, कुनो वन्यजीव अधिकारी आणि संपूर्ण भारतातील वन्यजीव प्रेमींचं मी खूप खूप अभिनंदन करतो”

Protected Content