….तर, राज्यात कायदा सुव्यवस्था नाही हे स्पष्टच दिसतेय – फडणवीस

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा |  बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमप्रसंगी केंद्रीय महिला आणि बाल कल्याणमंत्री स्मृती इराणी याच्या कार्यक्रमात गोंधळ निर्माण झाला.  इराणी यांचा ताफा परत जात असताना त्यांच्या वाहनांवर अंडी फेकण्याचा प्रयत्न झाला. या हल्ल्याचा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कठोर शब्दांमध्ये निषेध केला असून त्यांनी राज्यात कायदा सुव्यवस्था नाही हे स्पष्टच दिसत असून, थेट राज्यातील पोलीस यंत्रणेलाच इशारा दिला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपची वाटचाल या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमासाठी स्मृती इराणी या प्रमुख पाहुणे म्हणून आल्या होत्या. त्यांचे भाषण सुरू होण्यापूर्वी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय ‘भारतीय जनता पक्षाचा विजय असो’ आणि ‘जय श्रीराम’ अशा घोषणा भाजपा पदाधिकाऱ्या कडून देण्यात आल्या.  नेमके त्याचवेळी  त्याचवेळी महागाईच्या मुद्दयावर इराणी यांनी बोलावे, यासाठी ‘महात्मा गांधी की जय’ म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यां नी रंगमंदिराच्या परिसरात काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांकडून निदर्शने, काळे झेंडे दाखवत गोंधळ निर्माण करीत अंडी फेकण्यात आली.

या हल्ल्याचा निषेध विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कठोर शब्दांत करीत, ठिकाणी राज्यात सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते रोज कायदा हातात घेत बेकायदेशीर कृत्य करु लागले असून राज्यात कायदा सुव्यवस्था नाही हे स्पष्ट दिसत आहे. स्मृती इराणींवर हा हल्ला भ्याड असून आम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवणारे आहोत. आम्ही देखील जशास तसे उत्तर देऊ शकतो. पोलिसांना आम्ही संधी देत आहोत. जर पोलिसांनी योग्य कारवाई केली नाही तर आम्हालाही जशाच तसे उत्तर द्यावे लागेल, असा इशारा प्रसार माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी थेट पोलीसांना दिला आहे.

Protected Content