औरंगाबादचे नामांतर हा सरकारचा अजेंडा नाही – ना. टोपे

औरंगाबाद, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राज्यात भाजपाचे सरकार येत नाही तोपर्यंत ‘संभाजीनगर विसरा’ असा टोला माजी खा.चंद्रकांत खैरे यांना उद्देशून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. यावर आता राज्याचे आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांनी औरंगाबादचे नामांतर हा आमच्या महाविकास आघाडी सरकारचा अजेंडा विषय नाही असे स्पष्ट म्हटले आहे.

शनिवारी मुंबईच्या बीकेसी मैदानावर तसेच शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियान सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर नामांतर करायची गरज काय? असे म्हटले होते. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या झालेल्या सभेत  ‘संभाजीनगर’चा मुद्दा उपस्थित करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत ‘खैरे व्हा बहिरे…’, भाजपाचं सरकार येत नाही तोपर्यंत औरंगाबादचे संभाजीनगर ‘ विसरा’ असा टोला माजी खा. खैरे यांना उद्देशून लगावला होता.

यावरून औरंगाबाद येथे प्रसारमाध्यमांनी बोलतांना ‘ औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याचा आमच्या पक्षाच्या आणि सरकारच्या अजेंड्यावरचा विषय नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. दरम्यान, गेल्या वर्षी राज्याचे महाविकास आघाडी सरकारकडून औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करणार असल्याचा दावा देखील करण्यात आला होता.

Protected Content