Home Cities अमळनेर विजेच्या खांबाला अज्ञात वाहनाची धडक; सीसीटीव्हीत होणार उघड

विजेच्या खांबाला अज्ञात वाहनाची धडक; सीसीटीव्हीत होणार उघड

0
51

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील राजश्री शाहू चौकात अज्ञात वाहनाने सीसीटीव्हीच्या वीज खांबाला धडक दिली. खांबाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने खांब काही प्रमाणात जमिनीतून बाहेर आला. पण, हा धक्का कोणी दिला. हे आता सीसीटीव्हीत उघड होणार आहे.

या घटनेचा शोध घेण्याची बाब आणि जबाबदारी पालिकेची आहे. वर्दळीमुळे या धक्का दिलेल्या वाहनाने प्रश्नचिन्ह उभे केले आहे. सदर वाहनधारक शोधून पालिकेमार्फत या वाहनाचा तपास करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या रस्त्यावर लामा जिनिंगच्या ट्रक व वाळूचे ट्रक सुसाट धावतात या भागातील नगरसेवक असलेले शाम पाटील यांनी सदर खांबाला सिमेंट पाईप बसविलेल्या खांबाचा सिमेंट पाईपच वाकवून टाकल्याने खळबळ उडाली आहे. योगायोगाने हा खांब कोसळला असता तर यावरील हायमॉस्ट व डीवायएसपी राकेश जाधव यांनी मेहनतीने बसविलेल्या सीसीटीव्ही यंत्रणा बाराच्या भावात गेली असती, असे मत येथील नागरिक व्यक्त करत आहेत. याबाबत पालिका व पोलीस विभागाने सदर ठोकारलेल्या वाहनचालकविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी येथील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

 


Protected Content

Play sound