खेडगाव नंदीचे येथे फिरत्या वाचनालयास प्रारंभ

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील खेडगांव नंदीचे येथे अभिव्यक्ती मिडीया फॉर डेव्हलपमेंट,नाशिक व खेडगाव (नंदीचे) ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले मुली व महिलांसाठी मोफत वाचनालयाचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी यावेळी सरपंच ज्योती सोनवणे,उपसरपंच भगतसिंग पाटील,संजय पाटील,ग्रामसेवक एस.आर.पाटील,सुनिता भोसले तसेच युवती आणि महिला उपस्थित होत्या. याप्रसंगी डॉ. अस्मिता पाटील म्हणाल्या की, विद्यार्थीनींना शालेय जीवनात व व्यक्तिमत्व विकासाकरिता उपयुक्त ठरतील असे वाचनालय असणार आहे.या वाचनालयाच्या निमित्ताने एक वेगळा आत्मविश्‍वास जागृत झाला असून आपल्या मातृभाषेत पारंगत होण्यासाठी महिलांना वाचनालयातील ज्ञानभांडार उपयुक्त ठरले आहे.विविध अवांतर व पूरक वाचनामुळे ज्ञानात भर पडणार आहे तसेच मुलींमध्ये शिक्षणाची गोडी टिकून रहायला याची मदत होणार आहे.विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करु इच्छिणार्‍या मुलींसाठी अभ्यासिकेची सोय झाल्याने भविष्यातील संधी लक्षात घेता आजच्या मुली या उद्याचे भविष्यशाली नागरीक राहणार आहेत.

Add Comment

Protected Content