डॉ. हेडगेवार शिक्षण संस्थेतर्फे ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान

शेंदुर्णी- लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येथील डॉ. हेडगेवार शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरस्वती (प्राथमिक ) व श्रीकृष्ण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त ७५ वर्षावरील जेष्ठ नागरीकांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्षा डॉ. कौमुदी साने होत्या. अध्यक्ष्यांच्या हस्ते भारतमातेचे प्रतिमा पूजन व ध्वजारोहन करण्यात आले.

भारत देशाचा स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सवा निमित्त ७५ वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरीकांचा सत्कार संस्थेतर्फे करण्यात आला. त्यात देवराम बारी, कस्तूरशेठ जैन, लीलाबाई वानखेडे ,कडोबा सुर्यवंशी आदिंचा समावेश होता. तसेच भारतीय सैन्यामध्ये सेवा देणाऱ्या किरण गुजर, बी जी गुजर, प्रविण ठाकूर या सैनिकांचा सत्कार करण्यात आला. तसेच स्वरूप गुरुव या विद्यार्थ्याने स्कॉलरशिप परीक्षेत यश मिळविल्याने त्याचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी प्रोग्रेसिव इंग्लिश मेडीअम व लिटील च्याम्स किंडरगार्टन स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केले. तसेच नित्या राजपूत, विनित पगारे, तेजस्विनी बारी, हर्षल पाटील या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी सत्कारार्थी देवराम बारी यांनी मनोगत व्यक्त केले. व संस्थेचे आभार मानले अध्यक्षीय भाषण डॉ. कौमूदी साने यांनी केले. यावेळी भाजपा उप जिल्हाध्यक्ष गोविंद अग्रवाल, भाजपा नेते अमृत खलसे, शेंदुर्णी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा विजया खलसे, उपनगराध्यक्ष निलेश थोरात, सर्व नगरसेवक, संस्था सचिव कांतीलाल ललवाणी, संचालक डॉ. कल्पक साने, इंग्लीश मेडीअम स्कूल प्राचार्या रुचा साने तसेच विविध संस्थेचे पदाधिकारी, पालक, पत्रकार आदी मान्यवर उपस्थित होते .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार मुख्याध्यापक राजेंद्र पाटील यांनी केले तर सुत्रसंचालन उपशिक्षक प्रमोद सरोदे यांनी केले .

Protected Content