राज्य सरकारने पत्रकारांच्या न्याय मागण्या त्वरित मान्य करव्यात : संदिपसिंह राजपूत

 

रावेर, प्रतिनिधी  ।  महाराष्ट्र राज्यात आज ७ मे पर्यंत जवळपास ११५ पत्रकार  कर्तव्य बजावताना कोरोनाचे बळी ठरले आहेत. परंतु, पत्रकारांच्या न्याय मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करीत असून त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्यात अशी मागणी महराष्ट्र नवनिर्माण सेना रावेर तालुका अध्यक्ष संदिपसिंह राजपूत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनाचा आशय असा की,  महाराष्ट्रात आज दि. ७ मे २०२१ रोजी पर्यत जवळपास ११५ पत्रकारांचे कर्तव्य बजावत असताना कोरोनाचे बळी ठरले आहेत.  राज्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांना फ्रंट वारीयर म्हणून डॉक्टर आणि पोलीस यांच्याप्रमाणें कोरोनाने मृत झाल्यास त्यांच्या कुटुंबियाना ५० लाख रुपये देण्याचे वचन हवेतच विरले. केंद्र शासनाच्या वतीने कोरोनाने मृत पत्रकाराच्या कुटुंबियांना ५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे ही मागणी सुध्दा मान्य होत नाही. पत्रकारांसाठी  रुग्णालयात राखीव बेड, आँक्सिजन व आदी सुसज्ज यंत्रणा उपलब्ध करून द्यावी आणि सर्व वयोगटांतील पत्रकारांना लसीकरणाचा लाभ देण्याची आवश्यकता आहे.  आपण जातीने लक्ष घालून  त्वरीत योग्य कार्यवाहीसाठी  संबंधितांना आदेश द्यावेत अशी मागणी केली आहे.

 

Protected Content