यावल नगर परिषदेतर्फे घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी

 

यावल. प्रतिनिधी । येथील नगरपरिषदच्या माध्यमातुन कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर नागरीकांची घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.

६० हजाराच्या लोक संख्येवर पहोचलेल्या यावल शहरात कोरोना बाधीतांची सातत्याने वाढती संख्या व शहरातील पाच बाधीत रूग्णांच्या मृत्युनंतर फैजपुर विभागाचे प्रांत अIधिकारी डॉ. अजीत थोरबोले यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला तहसीलदार जितेन्द्र कुवर नगर परिषदचे मुख्यधिकारी बबन तडवी, यावल नगर परिषदचे नगराध्यक्ष राकेश मुरलीधर कोलते व सर्व नगरसेवकआणि कर्मचारी अधिकारी उपस्थतीत होते. या बैठकीत प्रांत डॉ. थोरबोले यांनी शहरातील नागरीकांच्या आरोग्याच्या हष्टीकोणातुन घर घर जावुन टेम्परेचर गन व ऑक्सीजन मिटर या यंत्रणेच्या माध्यमातुन प्रत्येक नागरीकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात यावी अशी सुचना दिली. त्या अनुषंगाने नगर पारिषदच्या वतीने कर निरिक्षक निकेतन बियाणी , लिपीक राजेन्द्र गायकवाड, प्रकल्प अधिकारी तुषार सोनार , नगररचनाकर स्वप्नील म्हस्के, लिपीक राजेन्द्र बारी आणि विद्युत अभीयंता राजेन्द्र पांडे यांच्या पथकाच्या माध्यमातुन या यंत्रणेव्दारे शहरातील स्लम क्षेत्र आणि प्रमुख मार्गावरील व्यवसायीक दुकानदार यांची तपासणी केली जात असल्याचे सांगण्यात आले. या तपासणीत त्यांना अद्याप कुठलेही कोरोना संसर्गाची लक्षणे असलेली व्यक्ती आढळुन आले नसल्याचे नगर परिषद प्रशासनाच्या वतीने सांगीतले गेले.

Protected Content