विघ्नहर्तामध्ये हृदयरोगतज्ज्ञ डॉ. स्वामी उपलब्ध; पाचोर्‍यातच अँजिओग्राफी/अँजिओप्लास्टीची सुविधा !

cardiography department vighnaharta hospital pachora

पाचोरा प्रतिनिधी । येथील विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये केईएममधील विख्यात हृदयरोगज्ज्ञ डॉ. एम. स्वामी यांच्यासह सुसज्ज कार्डियाक विभाग उपलब्ध असून यामुळे आता पाचोरा परिसरातच अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी व अन्य हृदयविकारांवर उपचाराची सुविधा मिळाली आहे.

सध्या हृदयरोगांचे प्रमाणे प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे. वेळीच निदान होऊन उपचार मिळाल्यास रूग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो. यात साध्या इसीजीपासून ते टू-डी इको कार्डीओग्राफ, अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी आदी विविध उपचार पध्दती सध्या आहेत. यातील अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी या अतिशय महत्वाच्या सुविधा आजवर पाचोरा तसेच परिसरातील कोणत्याही तालुक्यांमध्ये उपलब्ध नव्हत्या. नेमकी हीच गरज लक्षात घेऊन, डॉ. भूषण मगर-पाटील आणि डॉ. सागर गरूड यांनी आपल्या विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये या सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध केल्या. यासाठी केईएममधील सुप्रसिध्द हृदयरोगतज्ज्ञ डॉ. एम. स्वामी हे येथे पूर्णवेळ उपलब्ध असून त्यांच्या जोडीला येथे सुसज्ज कार्डीओ विभाग व प्रशिक्षित कर्मचारी आहेत. यामुळे येथे हृदयरोगी असणार्‍या रूग्णांना अहोरात्र सेवा मिळत आहे. येथे अगदी चोवीस तास इमर्जन्सी अँबुलन्स सेवा आणि फार्मसी सेवादेखील उपलब्ध करण्यात आलेली असल्याने परिसरातील अनेक रूग्णांचे प्राण वाचले आहेत.

दरम्यान, हृदयरोग आणि यांच्याशी संबंधीत विकार आणि चाचण्यांबाबत डॉ. एम. स्वामी ( एम.डी.-मेडिसीन व डीएम-कार्डिओलॉजी ) यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, हृदयरोगाशी संबंधीत सर्व चाचण्या आणि उपचार पध्दती विघ्नहर्तामध्ये उपलब्ध आहेत. यात अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी या महत्वाच्या शस्त्रक्रियांसह वालवुलर हृदयरोग, २-डी डॉपलर इको कार्डीओग्राफी, ३-डी इको कार्डीओग्राफी, बालरोग इको-कार्डीओग्राफी, पेसमेकर, डोबुटामाईन स्ट्रेस इको, जन्मजात हृदयरोग (हृदयामध्ये छिद्र) आदींवरील उपचारांचा समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली. सर्वात लक्षणीय बाब म्हणजे महात्मा फुले किंवा आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत यातील बहुतांश उपचार मोफत केले जातात. कोणत्याही हृदयरोग्याला वेळेत उपचार मिळाल्यास त्याचा प्राण वाचू शकतो. अगदी हृदयविकाराचा झटका आला तरी तीन तासांच्या आत ट्रिटमेंट सुरू झाल्यास रूग्ण अगदी पुर्णपणे बरा होतो. यामुळे पाचोर्‍यासह परिसरातील तालुक्यांमधील हृदयरोग्यांना विघ्नहर्तामध्ये वेळीच उपचार मिळणार असल्याचे ते म्हणाले.

पाचोराच नव्हे तर परिसरातील कोणत्याही रूग्णाला विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलमधील हृदयरोगांशी संबंधीत सेवांची माहिती हवी असल्यास : ०२५९६-२४४००४/२४४००५ अथवा ६२९५८१६३८८ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

पहा : विघ्नहर्तामधील अद्ययावत कार्डीयाक सुविधांबाबत डॉ. एम. स्वामी यांनी दिलेली माहिती.

Protected Content