हिंदुसूर्य महाराणा प्रतापसिंहजी यांच्याविषयी एकेरी शब्दाचा तीव्र निषेध

7983286b 7cb0 4c79 b051 b47b950e85ea

धरणगाव (प्रतिनिधी) इयत्ता 7 वि च्या इतिहास-नागरिकशास्राच्या पुस्तकात हिंदुसूर्य महाराणा प्रतापसिंह यांच्याविषयी एकेरी शब्द प्रयोग करण्यात आला आहे. याच्या निषेधार्थ आज येथील राजे प्रतिष्ठानतर्फे तहलीदारांना निवेदन देत पुस्तकातील मजकूर बदलण्याची मागणी करण्यात आली आहे.

 

 

राजे प्रतिष्ठानतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इयत्ता 7 वि च्या इतिहास-नागरिकशास्राच्या पाठातील प्रकरण 2 रे शिवपूर्वकालीन भारत पाठातील पृष्ठ क्र. 8 वर पाठ्यपुस्तकात स्पष्टीकरण करताना एकेरी उल्लेख करून त्यांच्या शौर्याला-कार्याला प्रचंड पराक्रमास शासन व शिक्षण एक प्रकारे डाग लावण्याचे काम करत आहे. तसेच विद्यार्थ्यांना अशा प्रकारे महापुरुक्षांबद्दल अनादरयुक्त शब्दांनी शिकवून सरकार काय सिद्ध करू इच्छित आहेत? पाठयपुस्तकात वेळीच बदल केला नाही तर राजे प्रतिष्ठानच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन इतिहास विषय समिती व अभ्यासगट या सर्वांचा राजे प्रतिष्ठान धरणगाव तालुका व सर्व समाजबांधवमार्फत निषेध व्यक्त करण्यात आला.

 

यावेळी राजे प्रतिष्ठान तालुकाध्यक्ष वैभव पाटील,दिनेश भदाणे,ललित मराठे,राजू महाजन,विक्रम पाटील,किरण पाटील,वैभव वानखेडे,योगेश पाटील,विजय राजपूत,अतुल भदाणे,गौरावसिंग चव्हाण,अश्विन पाटील,दिनकर पाटील,ललीत पाटील,अविनाश पाटील,वैभव पाटील,विशाल देवरे,अभिजित शिरसाठ,गौरव पाटील,विशाल चौधरी,रोहित मगर,पवन भदाणे,योगेश माळी,विनोद सोनवणे,किशोर पाटील,तुषार पाटील,गणेश पाटील,खुशवंत बयस,योगेश महाजन,विनोद पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content