पाचोरा ते परधाडे दरम्यानमधील “ते” रेल्वे गेट राहणार २३ सप्टेंबरपर्यंत बंद

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | पाचोरा ते परधाडे रेल्वे स्थानका दरम्यान असलेले रेल्वे गेट क्रं. १३२ हे रेल्वे रुळाची दुरुस्ती व छनाई तसेच स्लीपर बदलविणे ही कामे रेल्वे प्रशासनास करावयाची असल्याने सदरचे गेट हे दि. २१ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजेपासून ते दि. २३ सप्टेंबर २०२२ सकाळी ८ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे माध्यमांना दिली आहे.

या गेटवरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशी व शेतकऱ्यांनी दरम्यान च्या काळात पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. तसेच याबाबतच्या सूचना पाचोरा पोलिस स्टेशन, पाचोरा नगरपरिषद, पाचोरा ग्रामीण रुग्णालय, अंतुर्ली ग्रामपंचायत, भातखंडे खु” ग्रामपंचायत व रेल्वे प्रबंधक, पाचोरा यांना देखील पत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत.

Protected Content