रूपी बँकेला लागणार टाळे ! : आरबीआयचा दणका

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सहकार क्षेत्रातील आघाडीची बँक म्हणून ख्यात असणार्‍या रूपी सहकारी बँकेचा परवाना आरबीआयने रद्द केल्याने आता या बँकेला टाळे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

रूपी को-ऑपरेटीव्ह बँकेचा परवाना हा रिझर्व्ह बँकेने रद्द केल्या आहे. यामुळे आता या बँकेला टाळे लागणार असल्याचे स्पष्ट झाल्याने ठेवीदार हादरले आहेत. कारण आता बँकेतून ठेवी काढता येणार नाहीत. १९१२ साली स्थापन झालेली ही बँक गेल्या काही वर्षांपासून अडचणीत आली होती. बँक वाचविण्याचे प्रयत्न विविध स्तरावर सुरू होते. या अनुषंगाने राज्य सहकारी आणि सारस्वत बँकेने ही बँक ताब्यात घेण्याची तयारी दाखविली होती. मात्र आरबीआयने ८ ऑगस्टला रुपी बँकेचा परवानाच रद्दबातल करण्याचा आदेश काढला. यानंतर सहा आठवडयांच्या मुदतीनंतर म्हणजे २२ सप्टेंबरनंतर ‘रुपी’ला ‘बँकिंग’ व्यवसाय करता येणार नाही आणि अर्थातच ठेवी स्वीकारणे आणि त्यांची परतफेड या दोन्ही गोष्टी करता येणार नाहीत. तसेच सहकार आयुक्तांनी बँकेवर अवसायानाची कारवाई करण्याचा आदेशही आरबीआयने दिला आहे.

तर दुसरीकडे उच्च न्यायालयानेही बँकेला कोणताही दिलासा दिलेला नाही. अखेरचा प्रयत्न म्हणून आज पुन्हा उच्च न्यायालयात दाद मागण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे बँकेतील सूत्रांनी सांगितले. त्यामुळे या बँकेच्या अस्तित्वाचा आज, अखेरचा दिवस असून २२ सप्टेंबरपासून या बँकेवर अवसायानाची कारवाई सुरू होईल. अर्थात बँकेला टाळे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content