नवी मुंबईतील १४६ पोलिसांना कोरोना !

नवी मुंबई (वृत्तसंस्था) नवी मुबई पोलीस दलात काम करणाऱ्या १४६ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांचादेखील समावेश आहे. शनिवारी देक्खील २४ पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यामध्ये कामोठे पोलीस ठाण्यातील ८ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

 

वाहनाची कागदपत्रे तपासणे, चौकशी करणे, वाहने जप्त करणे, त्यांना कोर्टात हजर करणे यांसारख्या जबाबदारीच्या कामांमुळे आता पोलीस कर्मचारी मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित होत आहेत. नवी मुबई पोलीस दलात काम करणाऱ्या १४६ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांचादेखील समावेश आहे. एवढेच नव्हे तर काही पोलिसांच्या कुटुंबियांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ५० टक्के पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांना कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर, कोरोना विषाणूचा सर्वाधिक फटका हा पोलीस कर्मचाऱ्यांना बसला आहे. राज्यात जवळपास ४ हजाराहून अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

Protected Content