कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मस्कावद येथे गट विकास अधिकाऱ्यांची बैठक

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील मस्कावर येथे गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत. याच पार्श्वभूमीवर गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी आरोग्य विभाग व लोक प्रतिनिधीची बैठक घेऊन त्यांना उपाय-योजनेबद्दल सूचना केल्या आहे. तथापि, ही कोरोना विषाणूची दूसरी लाट असल्याची शक्यता वर्तवली आहे.

कोरोना व्हायरसची दूसरी लाट येण्याची शक्यता असून गावात सर्वांनी माक्सचा वापर करा व सोशल डिस्टसिंगचे काटेकोरपणे ग्रामस्थांनी पालन करावे कोणीही विना माक्स गावात फिरतांना आढळल्यास त्यांच्या कडून दंड वसूल करा गावातील विक्रेत्यांनी माक्स लावल्या शिवाय भाजीपाला किंवा इतर वस्तु विक्री करू नये करण्याचे जवळ नेहमी सॅनिटायझर वापर करण्याचे आदेश गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी दिले आहे. 

दरम्यान मस्कावर येथे आयोजित बैठकीला जिल्हा परिषद सदस्य कैलास सरोदे गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल, वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवराज पाटील, डॉ तुषार चौधरी, डॉ प्रियंका राजपूत, विस्तार अधिकारी सोनवणे, डॉ एम डब्लू पाटील आदी आरोग्य प्रशासन ग्राम पंचायत प्रशासन व पोलिस पाटील बैठकीला उपस्थित होते.

 

Protected Content