चाळीसगावात महिला आरोग्य शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद

be81ddb7 e111 42b5 9be3 840e1ecf70bb

 

चाळीसगाव (प्रतिनिधी) येथील धनगर समाज उन्नती मंडळ व उत्सव समितीच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त समाजातील महिलांसाठी आई फाऊंडेशनच्या सहकार्याने महिला आरोग्य निदान व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये सुमारे 250 ते 300 महिलांनी सहभाग नोंदवून उस्फुर्त प्रतिसाद देत उपक्रमाचा लाभ घेतला.

 

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 294 व्या जयंतीनिमित्त दिनांक 7जून रोजी सायंकाळी पाच वाजता अहिल्यादेवी नगर येथील धनगर समाज भवनामध्ये परिसरातील महिलांसाठी मोफत महिला आरोग्य निदान व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी आई फाऊंडेशनचे अमोल सहकार्य लाभले. कार्यक्रम प्रसंगी स्त्री रोग तज्ञ डॉक्टर विनोद कोतकर, डॉक्टर चेतना कोतकर यांनी शिबिरार्थी महिलांना मार्गदर्शन करून उपस्थित महिलांची तपासणी करत मोफत औषधांचे वाटप केले. स्टेपअप फाऊंडेशनच्या संयोजिका रसिका जानराव यांनी उपस्थित महिलांना मासिक पाळीबाबत घ्यावयाची काळजी या विषयावर मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे समाजातील गरजू व गरीब महिलांसाठी शासनाच्या आवश्यक सेवा सुविधा बाबतची माहितीही दिली.

 

शिबिराची सुरुवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून डॉक्टर विनोद कोतकर, डॉक्टर चेतना कोतकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी धनगर समाजाचे अध्यक्ष पोपटा आगोणे, सचिव रमेश जानराव, उत्सव समितीचे अध्यक्ष पांडुरंग बोराडे, सचिव योगेश साबळे, उपाध्यक्ष रवींद्र आगोणे, उत्सव समितीच्या अध्यक्षा संगीता आगोणे, समाजातील ज्येष्ठ सदस्य साहेबराव, आ गोणे, साईनाथ देवरे, देविदास आगोणे, ॲडव्होकेट खंडू कोर, संदीप हडप, समाजातील ज्येष्ठ महिला लिलाबाई आगोणे, सिंधुबाई आगोणे, रजनी जानराव सुभद्राबाई आगोणे, लिलाबाई साबळे, शोभा बोराडे, मनीषा आगोणे, सोनाली साबळे आदी महिला उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उत्सव समितीचे पदाधिकारी निवृत्ती आगोणे, विठोबा जाधव, मच्छिंद्र आगोणे, गणेश साबळे, संतोष आगोणे, सोमनाथ आगोणे, राजू आगोणे, यांच्यासह समाजातील तरुण कार्यकर्ते, महिला तरुणी व मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Add Comment

Protected Content