दहावीचा निकाल जाहीर ; ७७.१० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

result002 20180589701

पुणे (वृत्तसंस्था) महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला असून ७७.१० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा निकालाचा टक्का कमालीचा घसरला आहे. विशेष बाब म्हणजे यंदाच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे.

 

दहावी बोर्डाचे निकाल जाहीर झाली असून सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला आहे. तर सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा लागला आहे. कोकण विभागाचा निकाल ८८.३८ टक्के लागला असून नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे ६७. २७ टक्के इतका लागला आहे. एकूण १६ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. ज्यापैकी १२ लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्याचा दहावीचा निकाल ७७.१० टक्के. निकालात तब्बल १२ टक्के घट झाल्याचे दिसून आलेय. अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीत बदल झाल्यानंतरची ही पहिलीच परीक्षाअसल्यामुळे निकालाची टक्केवारी कमी झाल्याची माहिती शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी दिली.

विभाग निहाय निकाल 

पुणे- 82.48 टक्के
नागपूर 67.27 टक्के
संभाजीनगर-75.20 टक्के
मुंबई-77.04 टक्के
कोल्हापूर-86.58 टक्के
नाशिक-77.58 टक्के
अमरावती-71.98 टक्के
लातूर-72.87 टक्के
कोकण-88.38 टक्के

 

या ठिकाणी बघा निकाल 

www.mahresult.nic.in
www.sscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com
www.mahresult.nic.in

 

 

 

Add Comment

Protected Content