अग्निपथ प्रवेश योजना विरोधात अमळनेरात भव्य मोर्चा

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ प्रवेश योजने’ विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी व युवक काँग्रेसच्या माध्यमातून शहरातील तिरंगा चौकातून महाराणा प्रताप चौक, तहसील कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला.

या दरम्यान अमळनेर तालुक्यातील सर्व सैन्य व अर्धसैनिक बलासाठी प्रयत्न करत असणाऱ्या विद्यार्थी व युवकांनी मोट्या संख्येने यात सहभाग घेतला होता. यावेळी जमलेल्या विद्यार्थ्यांनी केंद्रशासनाच्या विरोधात घोषणा देत आपला निषेध नोंदविला. केंद्र शासनाने या योजनेमध्ये योग्य बदल नाही केला तर येणाऱ्या दिवसात तालुक्यातील विद्यार्थी व युवक जळगाव जिल्ह्याचे खासदार यांच्या कार्यालयावर हा मोर्चा काढणार असल्याचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष सनी गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे, तालुकाध्यक्ष अनिरुद्ध शिसोदे, शहराध्यक्ष सनी गायकवाड, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेश पाटील, कार्याध्यक्ष कुणाल चौधरी, शहराध्यक्ष तौसिफ तेली, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे दुर्गेश साळुंखे, कृष्णा बोरसे, तेजस पाटील, उज्वल निकम, आकाश सैदाने, शुभम सुर्यवंशी, आदित्य संदाशिव, दर्शन पाटील, गौरव राजपूत, वैभव राजपूत, यश राजपूत, वेदांत पाटील, ऋषी बोरसे, बाबाजी पाटील, हिमांशू पाटील, दिग्विजय निकम आणि समीर शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!