Home राजकीय काँग्रेसचा सरकारला बाहेरून पाठींबा

काँग्रेसचा सरकारला बाहेरून पाठींबा

0
103

shivsena and congress

मुंबई प्रतिनिधी । काँग्रेसने शिवसेनेच्या सरकारला बाहेरून पाठींबा देण्याचा निर्णय घेतला असून याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होऊ शकते.

आज दिवसभरात मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी झाल्या आहेत. दिल्लीत सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी राज्यातील महत्वाच्या नेत्यांची केंद्रातील नेत्यांसोबत बैठक झाली. यात नेमके काय घडले याची माहिती समोर आली नाही. तथापि, सूत्रांच्या माहितीनुसार सरकारमध्ये सहभागी होण्याऐवजी काँग्रेस पक्ष बाहेरून पाठींबा देण्यावर एकमत झाल्याचे वृत्त आहे. याबाबत लवकरच अधिकृत निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.


Protected Content

Play sound