अमळनेर, प्रतिनिधी । येथील ढेकू रस्त्यावरील लामा जीन येथे आज सकाळी मोठ्या प्रमाणात आग लागून कापसाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अद्यापपावेतो अमळनेर ग्रामीण पोलिसात या घटनेबाबत गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता.
अमळनेर नगरपालिकेचे तीन बंब व अग्निशामक दलाचे कर्मचारी यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र मोठ्या प्रमाणात ही आग लागली. दरम्यान ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नसून मात्र जीन मधील सर्व कापूस जळून खाक झाला आहे. हे वृत्त कळताच अमळनेरच्या प्रांताधिकारी सीमा अहिरे, व पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अंबादास मोरे यांनी ही पाहणी केली. दुपारच्या ३ वाजेपर्यंत आग आटोक्यात आणण्यासाठीचे प्रयत्न सुरूच होते. दरम्यान या घटनेप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झालेला नव्हता.



