रविश कुमार यांना रॅमन मॅगसेस पुरस्कार जाहीर

download 3

मुंबई, वृत्तसेवा | पत्रकारिता क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारे एनडीटीव्ही चे मॅनेजिंग एडिटर रविश कुमार यांना यंदाचा रॅमन मॅगसेस पुरस्कार जाहीर झाला आहे. आशिया खंडातील नोबल पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पुरस्कार विजेत्यांच्या नावांची आज रॅमन मॅगसेसे पुरस्कार फाउंडेशनने घोषणा केली.

हिंदी टीव्ही पत्रकारितेत योगदानासाठी रविश कुमार यांना हा पुरस्कार मिळाला आहे. अरुण शौरी, पी साईनाथ यांच्यानंतर रविश कुमार यांच्या रूपाने आणखी एक भारतीय पत्रकाराचा या पुरस्काराने सन्मान होणार आहे. यंदा हा पुरस्कार मिळवणाऱ्या पाच जणांमध्ये रविश कुमार एकमेव भारतीय आहेत. रविश कुमार यांच्यासह म्यानमारचे को. सी. विन, थायलंडच्या अंग हाना नीलपायजित, फिलिपाईन चे रमेंड आणि दक्षिण कोरियाची किम जोंग यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. रविश कुमार यांना हा पुरस्कार पत्रकारितेत वंचितांचा आवाज बुलंद करण्यासाठी दिला जात असल्याचे रॅमन मॅगेसेस कमिटीच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. रविश कुमार यांचा कार्यक्रम ‘प्राईम टाईम’ हा जीवनातील खरे मुद्दे आणि सामान्यांच्या अडचणींवर भाष्य करतो असं रॅमन मॅगसेस फाउंडेशन म्हटले आहे. ‘रॅमन मॅगेसेस’ला आशियाचा नोबेल पुरस्कार आहे म्हटलं जातं. आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अशियातील व्यक्ती आणि संस्थांना रॅमन मॅगसेस पुरस्कार प्रदान केला जातो. फिलिपाईनचे माजी राष्ट्रपती रॅमन मॅगसेस यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार शासकीय सेवा, सार्वजनिक सेवा, सामूहिक नेतृत्व, पत्रकारिता तसेच साहित्य ,शांतता आणि उदयोन्मुख नेतृत्व या क्षेत्रात देण्यात येतो.

Protected Content